भारतीय प्रसारमाध्यमं लोकांच्या बाजूनं नाही, त्यांच्या विरोधात काम करतात!
प्रसारमाध्यमांनी आपलं राष्ट्रहिताचं कर्तव्य जाणून एका आधुनिक विचारविश्वाचं नेतृत्व केलं पाहिजे. युरोपच्या स्थित्यंतराच्या काळात व्हॉल्टेअर, रुसो, थॉमस पेन यांनी जशी जबाबदारीची भूमिका निभावली, तशीच भूमिका सध्याच्या भारतीय प्रसारमाध्यमांनी निभावली पाहिजे. भारतीय लोकांच्या मनोरंजनाला महत्त्व देणार्या हीन अभिरूचीला शरण जाण्याऐवजी वैज्ञानिक विवेकवादाची कास धरून त्यांची बौद्धिक पातळी उंचावली पाहिजे.......